#म्हैसूर_सफरनामा, #भाग_२६
#म्हैसूर_सफरनामा #kodaikanal #Guna_Caves #भाग_२६ गेल्या भागात मी कोडाईकॅनलच्या Coaker's Walk आणि पिलर रॉक फिरताना आलेल्या अनुभवाविषयी सांगितलं.. पिलर रॉक बघून आम्ही माघारी फिरलो.. आणि आता आम्ही निघालो, ही ट्रीप ज्या कारणासाठी करायची ठरवली होती, त्या पॉइंटकडे, अर्थात "Gunaa Caves" कडे.. मला खात्री आहे, डिसेंबर २०२४ मधे जेव्हा आम्ही फिरत होतो, तेव्हा तिथले फोटो विडियो मी माझ्या सोशल मीडिया वॉल वर पोस्ट केले आहेत. कदाचित काही वाचकांनी ते विडियो बघितले असतील.. Guna Caves मी आणि माझी लेक कमालीच्या उत्साहात होतो.. पुढे जाण्याआधी, एक विलक्षण गोष्ट म्हणजे, जेव्हा आम्ही pillar rock point बघितला, तेव्हा त्याच उग्र रौद्र खडकरूपी सुळक्यांच्या ऐन मध्ये कुठेतरी Guna Caves आहेत ह्याची सुतराम कल्पना नव्हती.. इथे मी कितीही उत्तमरित्या आमचे अनुभव सांगितले असले तरी हे ठिकाण प्रत्यक्ष बघितल्याशिवाय नशा येणारच नाही.. आयुष्यात किमान एकदा तरी अनुभवावी अशी विलक्षण जागा, "Guna Caves" Guna Caves : ह्या मुग्ध करणाऱ्या ठिकाणाविषयी मी जितक लिहिन ते कमीच आहे.. २,२०० मीटर उंचीवर अ...